Share

“५६ नाही त्यापेक्षा जास्त आकडा लोक सांगतात,” Sushma Andhare यांचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा

by MHD
Sushma Andhare criticizing Chitra Wagh

Sushma Andhare । पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची (Disha Salian death case) चर्चा होत आहे. यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून आज विधिमंडळात हा मुद्दा चांगलाच गाजला. सत्ताधाऱ्यांनी आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला.

आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) या सरड्याप्रमाणे रंग बदलतात, अशी टीका केली होती. त्यावरून वाघ यांनी टीकेला प्रत्युत्तर देताना तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते, असे वक्तव्य केले होते. यावर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वाघ यांचा आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर खरपूस समाचार घेतला आहे.

Sushma Andhare post on X

सुषमा अंधारे X वर लिहितात, “सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत १ बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या 56 जण पायाला बांधून फिरते. ही भाषा कोणत्या शाळा, कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही. पण हे दरवेळी सांगायची गरज काय. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात,” असा घणाघात अंधारे यांनी केला आहे.

महत्त्वाचे म्हणजे सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांचे नाव न घेता टीका केली आहे. त्यांच्या या टीकेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. यावर आता त्यांना चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

Satish Salian on Aditya Thackeray

दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून तिचे वडिल सतीश सालियन यांनी वकील अभिषेक मिश्रा यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यामुळे ठाकरेंच्या अडचणीत भर पडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Sushma Andhare has now responded to Chitra Wagh criticism of Anil Parab.

Politics Maharashtra Marathi News