🕒 1 min read
Disha Salian । दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन (Disha Salian death case) राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. हाच मुद्दा उचलून धरत सत्ताधारी आता आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका करत आहेत.
“आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या केली आहे. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा,” अशी मोठी मागणी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या मदतीसाठी आता करुणा मुंडे (Karuna Munde) या मैदानात उतरल्या आहेत. “तुम्ही ज्याप्रमाणे दिशा सालियनसाठी न्याय मागत आहात, त्याप्रमाणे पूजा चव्हाणला (Pooja Chavan Suicide case) देखील न्याय द्या. प्रकरणासाठी सीबीआय चौकशी लावण्यात यावी,” अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण हे प्रकरण शिंदे गटाचे आमदार तथा माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याशी निगडित आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असताना याच प्रकरणावरुन संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
Karuna Munde on Pooja Chavan Suicide case
अशातच आता सत्ताधारी सालियान प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. अशातच आता करुणा मुंडे यांनी पूजा चव्हाण प्रकरणाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी येऊ शकते. आता या प्रकरणावर सत्ताधारी काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ओ Anil Parab, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी : चित्रा वाघ
- “मुलाला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी….”; Nitesh Rane यांचा मोठा खुलासा
- सालियान यांच्या वकिलांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले; “दिशाच्या फ्लॅटवर Aditya Thackeray …”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












