Nitesh Rane । तब्बल पाच वर्षांनंतर दिशा सालियनच्या (Disha Salian) कुटुंबीयांनी हायकोर्टात धाव घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागलं आहे. याचे पडसाद आज अधिवेशनात देखील पाहायला मिळाले.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन (Satish Salian) यांच्यासह विरोधकांनी निशाणा साधला आहे. मागील 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रकरण कोर्टात आहे ते कोर्टात पाहू, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
यावर आता मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “आता कोर्टात पाहू, तुम्हाला जास्त त्रास नाही देणार. तुम्हाला याप्रकरणी जे बोलायचे ते कोर्टात बोला. पण कोर्टात हे देखील सांगा की ज्यांची मुलगी गेली, सतीश सालियन आता खोटं बोलत आहेत,” असे राणे म्हणाले.
“मालवणी पोलीस ठाण्यामध्ये नारायण राणे (Narayan Rane) यांनी ऑन रेकॉर्ड सांगितले होते की त्यांना उद्धव ठाकरे यांचे दोन वेळा फोन आले होते. माझ्या मुलाला वाचवा तुम्हालाही दोन मुलं आहेत. त्याला मदत करा, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले असल्याचे राणेंनी स्पष्ट केले.
Nitesh Rane on Uddhav Thackeray
दरम्यान, नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणी नवीन बॉम्ब टाकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :