Aditya Thackeray । दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जावी, यासाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच त्यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही आरोप केले आहेत.
यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले आहे. आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेतली असून याप्रकरणी आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Disha Salian death case)
“मागील 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रकरण कोर्टात आहे ते कोर्टात पाहू. महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही या सरकारला एका अधिवेशनात एक्सपोज केलं आहे. फक्त आम्ही नाही तर संघानेही एक्सपोज केले आहे,” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
“काल संघातील लोकही औरंगजेबाचा मुद्दा चुकीचा आहे असे म्हणाले होते. मग आता भाजप त्यांच्यावर कारवाई करेल का? आज महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे? हाच मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
Aditya Thackeray Criticizing the Government on Disha Salian case
ते पुढे म्हणाले की, “आज आम्ही राज्यपालांची भेट घेतली असता या भेटीदरम्यान आम्ही दोन तीन विषय त्यांच्यासमोर मांडले आहेत. रिमुव्हल मोशनवरून आम्ही त्यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. सत्ताधाऱ्यांकडे अजेंडा नाही,” असा आरोप ठाकरेंनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :