Sanjay Raut । दिशा सालियनचे (Disha Salian) वडील सतीश सालियन (Satish Salian) यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. सामूहिक बलात्कार करुन दिशाची हत्या केली आहे, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. त्यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर आरोप केले आहेत.
यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“ठाकरे कुटुंबाला, आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु असल्याचं यातून पाहायला मिळत आहे. औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटलं असल्याने यातून मुक्तता मिळवण्यासाठी मागच्या चार दिवसांपासून हे प्रकरण शिजत आहे,” असा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
“या देशात आणि राज्यात अशी अनेक प्रकरण घडत असतात. कुटुंबीय, आई-वडिल हे न्याय मागण्याचा प्रयत्न करतात आणि पोलीस तपासाला सहकार्य करतात. ही एक प्रथा आहे. दिशाच्या कुटुंबावर आता दबाव असल्याच वाटत आहे,” असा देखील आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut statement On Disha Salian Case
ते पुढे म्हणाले की, “आदित्य ठाकरे यांच्यासारख्या एका तरुण नेत्याच्या भविष्यावर आणि करिअरवर अशा प्रकारे चिखल उडवणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमच्यासारख्या अनेक नेत्यांवर देखील हे प्रयोग झाले होते. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही,” असा खुलासा संजय राऊत यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :