MS Dhoni । चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांचा पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. पहिला सामना कोणता संघ जिंकणार? याकडे दोन्ही संघांच्या चाहत्यांचे लक्ष लागलं आहे. अशातच सीएसकेचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) निवृत्तीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
महेंद्रसिंग धोनीला गुडघ्याच्या समस्या असून त्याला आयपीएल 2023 नंतर गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागली. आयपीएलच्या शेवटच्या दोन हंगामात त्याने एकूण 130 बॉल खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन धोनीला पाच वर्षे झाली आहे.
पण तो अजूनही आयपीएल खेळत आहे. अशातच आता भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) धोनीच्या निवृत्तीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. एका कार्यक्रमादरम्यान रॉबिन उथप्पाला धोनीच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
“जरी आयपीएलच्या (IPL) या हंगामानंतर धोनी निवृत्त झाला तरी आश्चर्य वाटणार नाही. यानंतर तो आणखी चार हंगाम खेळत राहिला तरी आश्चर्य वाटणार नाही. खेळाबद्दलची आवड कधीच संपेल असे त्याला वाटत नाही. धोनीचे खेळावरील प्रेम किंचितही कमी झालेले नाही आणि तो अजूनही तरुणाइतकाच चपळ आहे,” असे रॉबिन उथप्पा म्हणाला.
Chennai Super Kings Team
ऋतुराज गायकवाड, मथिशा पाथिराना, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, एम. एस धोनी, आर. अश्विन, डेवॉन कॉनवे, खलील अहमद, रचिन रविंद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, नूर अहमद, अंशुल कंबोज , सॅम करन, गुरजपनीत सिंग, नॅथन एलिस, दीपक हुडा, जॅमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, श्रेयस गोपाळ, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख राशिद.
महत्त्वाच्या बातम्या :