Santosh Deshmukh । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने (Santosh Deshmukh murder case) संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनदेखील त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरारच आहे.
अशातच आता कोर्टाने या प्रकरणी एक मोठा निर्णय घेतला आहे. बीड जिल्हा सत्र न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला चालवण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत विनंती अर्ज करण्यात आला होता.
दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आज या प्रकरणी न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता यापुढे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालवण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील बाळासाहेब कोल्हे यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, अवादा कंपनीमध्ये अशोक सोनवणे, अमरदीप सोनवणे आणि भैय्यासाहेब सोनवणे या वॉचमनला आरोपी सुदर्शन घुलेयाने त्याच्या साथीदारासह मारहाण केली होती. याच कारणास्तव वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्या अडचणी वाढल्या आहेत.
In Santosh Deshmukh murder case Court take decision due to security reasons
त्यामुळे घुले आणि त्याच्या साथीदारांवर या प्रकरणात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद केला आहे. या कंपनीच्या प्रकल्पाचे मॅनेजर शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराडच्या गँगमधील सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराने याच वॉचमन समोर खंडणी मागितली होती, अशी माहिती आता समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :