Nana Patole । नागपूरमध्ये झालेल्या हिसांचाराच्या घटनेवर आरएसएसने (RSS) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. औरंगजेब हा सध्याचा संयुक्तिक मुद्दा नाही. तसेच संघ कोणत्याही हिंसेचे समर्थन करत नाही, असे आरएसएसने म्हटले आहे.
आरएसएसच्या या भूमिकेवरून विरोधकांनी सरकारवर आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. “हे आरएसएसने आणलेलं सरकार आहे. सरकारमधील मंत्री या पद्धतीचे धार्मिक तेढ निर्माण असताना संघाने त्यांचे कान का नाही टोचले?,” असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
“संपूर्ण महाराष्ट्र पेटल्यांनंतर आता आम्ही नाही त्याच्यातले,असे सांगणे चुकीचे आहे. संघाची भूमिका म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे,” अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही संघावर निशाणा साधला आहे.
“विषय दुसरीकडे चालला आहे. देशामध्ये महागाई, बेरोजगारीच्या प्रश्न आहेत. भाजप आणि त्यांच्या अंगीकृत संघटना यांचे आज एवढ खोदूया, तेवढं खोदूया, इतकेच लक्ष असते. संघाचे भाजप तरी ऐकतंय का?,” असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
Jitendra Awhad on RSS
“हा वैचारिक विषय आहे. आमच्यापेक्षा आरएसएसचा वेगळा विचार आहे. मी संघाचा कट्टर विरोधक आहे, संघाच्या भूमिकेचे मी कौतुक करतो,” असे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :