Aditya Thackeray । दिशा सालियन प्रकरणाची (Disha Salian case) पुन्हा एकदा चौकशी केली जावी अशी याचिका दिशाच्या आई-वडिलांकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करा, अशी देखील मागणी याचिकेत केली आहे.
त्यामुळे पाच वर्षांनी पुन्हा एकदा दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणावरुन खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा (Nilesh Ojha) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आदित्य ठाकरे आणि डिनो मारियो हे दोन ते तीन तास दिशा सालियानच्या फ्लॅटवर होते,” असा खुलासा ओझा यांनी केला आहे.
“काही सिक्रेट बाबी समोर आल्या असल्याने आदित्य ठाकरे यांना तातडीने अटक होऊ शकते. याचिकाकर्ते, वकील, साक्षीदार यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं. समीर वानखेडे यांच्याकडे महत्त्वाच डेटा आहे,” असा गौप्यस्फोट ओझा यांनी केला आहे.
“आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतर यांच्याविरोधात गँगरेप, मर्डर 376 डी, 302, 120 अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले जावेत. कस्टडी घेऊन त्यांची लाय डिटेक्टर, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेतली जावी. आरोपीला मृत्यूदंड होईल, हे सुनिश्चित करण्यात यावे,” अशी मागणी निलेश ओझा यांनी केला आहे.
Nilesh Ojha criticize Aditya Thackeray
दरम्यान, विरोधक देखील आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. अशातच आता निलेश ओझा यांच्या मागणीमुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत भर पडली आहे. यावर ठाकरे त्यांना काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :