Anil Parab । बॉलीवूडचा दिवंगत अभिनेत सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) प्रकरणावरून सत्ताधारी विरोधकांवर निशाणा साधत आहेत. यामुळे राजकीय वातावरण चिघळले आहे. दिशा सालियनचे वडिल सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरुन या वादाला तोंड फुटले आहे.
अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले आहेत. यावरून आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला आहे. “किरीट सोमय्यांची (Kirit Somaiya) बायको आत्महत्या करायला चालली होती. जयकुमार गोरेंचे देखील फोटो सभागृहात आले होते. याप्रकरणाची चौकशी केली जात नाही,” असे परब म्हणाले.
“कायद्यानुसार आदित्य ठाकरे यांचं कायद्यानं जे काय होणार आहे ते होईलच. ठाकरेंची किती दिवस सीबीआय, एसआयटी आणि सीआयडी चौकशी सुरू आहे. सगळे विषय बाजूला सारण्यासाठी हे सुरु आहे का?,” असा सवाल अनिल परब यांनी सभागृहात विचारला.
“काल औरंगजेबची कबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्णपणे चेपून टाकली. सत्ताधाऱ्यांकडे आज दुसरा कोणताच विषय नाही. ठाकरेंची चौकशी करायला आमची काहीच हरकत नाही. पण या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय म्हणतात? की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे,” अशा शब्दात अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.
Anil Parab on Disha Salian death case
दरम्यान, तब्बल पाच वर्षांनंतर दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी सतीश सालियन यांनी आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. यामुळे प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :