Eknath Shinde Shivsena | ३० जानेवारीला ठरणार शिंदे गटाचे अस्थित्व; निवडणूक आयोगाकडून ‘तारीख पे तारीख’

Shivsena | नवी दिल्ली : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर आपला दावा सांगण्यात येत आहे. शिवसेनेकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण आमचे आहे असा दावा ठाकरे आणि शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने 17 जानेवारी रोजी दोन्ही गटाकडून युक्तीवाद ऐकून घेतला आणि निर्णय आज 20 जानेवारी रोजी देणार असल्याचे जाहीर केले होते.

केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) आज शिवसेनेचे (Shivsena) नाव आणि पक्ष चिन्हावर महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. जवळपास 1 तास 10 मिनिटे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी युक्तिवादासाठी उठले. पण निवडणूक आयोगाने त्यांना थांबवत ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण होऊ द्या, असे सांगितले. त्यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. ठाकरे गटाच्या दोन्ही वकिलांनी आज जोरदार युक्तिवाद केला. विशेष म्हणजे कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सर्वात महत्त्वाचा ठरला. या दोन्ही ज्येष्ठ वकिलांच्या युक्तिवादानंतर ठाकरे गटाचे मुख्य वकील महेश जेठमलानी यांनी केला. त्यानंतर शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला.

दरम्यान, दोन्ही वकिलांनी प्रत्येकी 15 ते 20 मिनिटे युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही गटांना सोमवारी लेखी उत्तर द्या, अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे याबाबतची पुढची सुनावणी आता येत्या 30 जानेवारीला होईल असे सांगण्यात आले आहे. येत्या 30 जानेवारी रोजी तरी धनुष्यबाण कोणाचा याचा निकाल लागतो की नाही? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button