Eknath Shinde Shivsena | ‘या’ दिवशी ठरणार ‘धनुष्यबाण’ कोणाचा?; आता द्यावं लागणार लेखी उत्तर!

Shivsena | नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) पक्ष कोणाचा त्याचबरोबर निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचं? या मुद्द्यावरुन जवळपास साडेतीन तासांपासून निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला.

दोन्ही गटांनी ‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्ष चिन्हावर दावा सांगितला आहे. निवडणूक आयोगासमोरील युक्तीवाद अंतिम टप्प्यात आला असला तरी मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कोणला द्यायचा? याबाबतचा संभ्रम कायम आहे. सोमवारी 30 जानेवारी रोजी याबाबत लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

दोन्ही गटांनी लेखी उत्तर दाखल केल्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. त्याबरोबर 23 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे मूळ शिवसेना नेमकी कुणाची हा पेच आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.