Share

Eknath Shinde | “त्यांच्या तोंडी नेहमी साखर”; एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव

🕒 1 min read Eknath Shinde | पुणे : महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना शिवसेनेच्या एकनाथ शिंदे ()Eknath Shinde) यांनी बंड पुकारुन शिवसेनेचा दुसरा गट तयार केला आणि भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे एकाच मंचावर उपस्थित होते. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | पुणे : महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना शिवसेनेच्या एकनाथ शिंदे ()Eknath Shinde) यांनी बंड पुकारुन शिवसेनेचा दुसरा गट तयार केला आणि भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे एकाच मंचावर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते असे जेष्ठ नेते शरद पवार’, असा उल्लेख करून जयंत पाटील यांना टोला लगावला आहे.

“ऊस शेती, साखर उद्योगासाठी समर्पित असणारी देशातील एकमेव संस्था असणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे. ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते शरद पवार, जयंत पाटील यांच्याही तोंडात साखर असते.  अधिवेशनात शेवटच्या दिवशी मी दादांना तुमची आठवण करुन दिली”, असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोला लगावला आहे.

“मागच्याच आठवड्यात संक्रांत झाली आहे. त्यामुळे सगळ्यांनी गोड गोड बोलायचं आहे आणि मी देखील दावोसला जाऊन आलो आपल्या राज्यात मोठी गुंतवणूक आली आहे.  कोणीही काही म्हणू देत, पवार साहेब नेहमी सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांचे योगदान खूप मोठे आहे. राज्याला मदत होण्यासाठी शरद पवार सूचना करत असतात.  मार्गदर्शन करत असतात. सहकार क्षेत्रात त्यांचे योगदान नाकारता येणार नाही, आज ज्यांचा सम्मान होणार आहे, त्यांच्यामुळे साखरेचे साम्राज्य उभे राहणार आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळली त्यांचे कोडकौतुकही कोले मात्र त्याचवेळी जयंत पाटलांना मिश्किल टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या