Eknath Shinde | ‘कसबा, पिंपरी-चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करा’; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना साकडे

Eknath Shinde | पुणे : पुणे शहरातील कसबा मतदार संघासाठी पोटनिवडणूक (Pune Election)जाहीर झाली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. पुण्यातील मांजरी येथे हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे शहरातील विधानसभा पोटनिवडणुकीबाबत भाष्य केले आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या संदर्भ देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘पुण्यातील पोटनिवडणूक बिनविरोध करा’, असे आवाहन केले आहे. पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या जागेची पोटनिवडणूक ही बिनविरोध करायची ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मुक्ता टिळक (mukta tilak)यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदार संघात २७ फेब्रवारी रोजी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रूपाली पाटील-ठोंबरे हे इच्छुक आहेत. त्यांनी जाहीरपणे आपली इच्छा बोलून दाखवली. ‘पक्षाने आदेश दिल्यास मीसुद्धा कसबा मतदार संघाची निवडणूक लढवण्यास तयार आहे. पण येणाऱ्या काळात महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते निर्णय घेतली’, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितले आहे.

काँग्रेसकडून शिंदे, धंगेकर, व्यवहारेंमध्ये चुरस

काँग्रेसमध्ये ही निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर आणि कमल व्यवहारे यांची नावे चर्चेत आहेत. भाजपच्या वतीने गणेश बिडकर, बप्पू मानकर, धीरज घाटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, स्वरदा बापट यांच्यापैकी एकाचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.  भाजपकडून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील उमेदवार म्हणून त्यांचे सुपुत्र कुणाल टिळक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

पिंपरी चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर भाजपकडून त्यांच्या पत्नी किंवाला भावाला उमेदावारी दिली जावू शकते. त्याच बरोबर राष्ट्रवादीकडून भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे हे उमेदवार इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना बिनविरोध निवडणूक करण्याची विनंती करत असताना त्याच मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवारही उपस्थित होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पुणे शहरातील काँग्रेसचा (Pune Congress)बड्या नेत्याने भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेस नेत्याने घेतले भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीत काय चर्चा झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.

महत्वाच्या बातम्या