Sanjay Raut | “त्यांच्यावर सरकारचा दबाव म्हणून निकालाला वेळ”; निवडणूक आयोगावरच्या निर्णयावरुन राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut | जम्मू : शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. शिंदेनी 40 आमदारांसोबत बंड केल्यानंतर भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. तेव्हापासून हे सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा विरोधकांकडून केला जाऊ लागला आहे. हा वाद आधी न्यायालयात आणि आता निवडणूक आयोगासमोर पोहोचला आहे. दोन्ही गटाच्या युक्तीवादानंतर निवडणूक आयोगाने निकाल न देता 30 जानेवारीची पुढची तारीख दिली. त्यावरुन शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

“निवडणूक आयोगावर सरकारचा दबाव आहे. त्यामुळेच निकाल द्यायला वेळलागत आहे. शिवसेनेचा अध्यक्ष कोण असावा हे आमचा पक्ष ठरवेल. इतर कोणीही ठरवणार नाही. अध्यक्ष ठरवणं न ठरवणं हा तांत्रिक मुद्दा आहे”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

“पक्षाचा अध्यक्ष ठरवण्याच्या प्रकरणात निवडणूक आयोग आला आहे. पण आमचा अध्यक्ष कोण असावा हे आमचा पक्ष ठरवेल. बाळासाहेब ठाकरे हे अजीवन अध्यक्ष होते. निवडणूक आयोगाने नियम केल्यानंतर आम्ही नंतर निवडणूक घ्यायचो. उद्धव ठाकरे हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. तेच राहतील”, असं संजय राऊत यांनी सांगितले आहे.

दरम्यान, संजय राऊत हे जम्मूच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. तसेच जम्मूमध्ये शिवसेना निवडणूक लढणार असल्याचेही राऊतांनी जाहीर केले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.