MLA Disqualification | मुंबई: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत येत्या दोन आठवड्यात सुनावणी घेऊन माहिती देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना दिले आहे.
या प्रकरणाची 14 सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडली होती. यानंतर ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली होती. अशात याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 25 सप्टेंबर रोजी ही सुनावणी होणार आहे. या माहितीनंतर शिंदे आणि ठाकरे गटातील आमदारांच्या चिंतेत भर पडली आहे.
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी 25 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या सुनावणीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमने-सामने येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत संकेत दिले आहे. राहुल नार्वेकर यांच्या या संकेतानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
My visit to Delhi was not sudden – Rahul Narwekar
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना झापल्यानंतर आता आमदार पात्रतेच्या सुनावणीच्या घडामोडींनी वेग धरला आहे. याच पार्श्वभूमीवर काल राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना झाले होते.
आज ते दिल्लीहून परतले असून मुंबईत येताचं त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “माझा दिल्ली दौरा अचानक ठरला नव्हता. हा दौरा पूर्वनियोजित होता. त्याचबरोबर या दौऱ्यादरम्यान होणाऱ्या भेटीगाठी देखील आधीच ठरलेल्या होत्या.
या दौऱ्यादरम्यान मी कायदे तज्ञांची भेट घेऊन आमदारांच्या अपात्रतेबाबत चर्चा केली आहे. एका आठवड्यात सुनावणी देण्याची निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
त्यानुसार आमची एक सुनावणी झालेली असून दुसरी सुनावणी लवकरच होणार आहे. गरज पडल्यास या सुनावणीला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना आम्ही बोलवू शकतो”, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Bacchu Kadu | CM शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील – बच्चू कडू
- Sanjay Raut | निवडणुकीला उभं राहिल्यावर त्यांना त्यांची उंची कळेल; संजय राऊतांचं रामदास कदमांना प्रत्युत्तर
- Aditya Thackeray | महाराष्ट्रात सध्या गद्दार, गँगस्टर, बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टरांचं सरकार – आदित्य ठाकरे
- Anil Parab | सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नार्वेकरांना निर्णय घ्यावाच लागेल – अनिल परब
- Rahul Narwekar | आमदार अपात्रतेबाबत घडामोडींना वेग; विधानसभा अध्यक्षांनी दिले मोठे संकेत