Share

Eknath Shinde | संजय राऊतांची गाढवावर बसून धिंड काढण्याची गरज; शिंदे गटाचा राऊतांवर घणाघात

🕒 1 min readEknath Shinde | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महिला आरक्षण विधेयकावरून मोदी सरकारवर टीका केली होती. संजय राऊत यांच्या या टीकेला नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. राणेंनी राऊतांना अभिनेते शक्ती कपूर यांची उपमा दिली होती.Related News for You‘नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब’; Gas Shortage … Read more

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महिला आरक्षण विधेयकावरून मोदी सरकारवर टीका केली होती.

संजय राऊत यांच्या या टीकेला नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. राणेंनी राऊतांना अभिनेते शक्ती कपूर यांची उपमा दिली होती.

त्यानंतर या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. संजय राऊत यांची गाढवावर बसून दिंड काढण्याची गरज आहे, असं नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut is an idiot – Narendra Bhondekar

नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) म्हणाले, “संजय राऊत महामुर्ख आहे. त्यामुळं त्यांना शक्ती कपूरपेक्षा मोठी उपमा द्यायला हवी होती. संजय राऊत यांनी महिला आरक्षण विधेयकावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया महिलांचा अवमान आहे.

लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं होतं. त्या विधेयकाला सर्व खासदारांनी पाठिंबा दर्शवला होता. मात्र, संजय राऊत यांनी या विधेयकाला विरोध दर्शवत मूर्खपणाचा कळस गाठला आहे. म्हणून संजय राऊत यांची गाढवावर बसून धिंड काढण्याची गरज आहे.”

दरम्यान, महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ बहुमताने मंजूर झाले हा महिला सशक्तीकरणाच्या वाटचालीतील एक ऐतिहासिक व निर्णायक घटना आहे.

या विधेयकामुळे लोकसभा तसेच विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षित भागीदारी मिळेल. लोकशाहीतील नारीशक्तीचा सन्मान करण्याचे हे स्तुत्य पाऊल आहे.

भारतीय समाजव्यवस्थेतील सर्वांगीण विकासाच्या उद्दिष्टांसाठी हा निर्णय अंमलात आणल्याबद्दल सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, त्यांचे केंद्र सरकारमधील सहकारी व संसदेतील सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार व अभिनंदन!”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!