Share

Rohit Pawar | पाळण्यात असलो तरी आम्हाला पुरोगामी विचार माहितीये – रोहित पवार

🕒 1 min readRohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्यावर वयावरून नेहमी टीका केली जाते. रोहित पवार पाळण्यात आहे, त्यांना काही कळत नाही, असं अनेकदा त्यांना ऐकावं लागतं. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. आम्ही पाळण्यात असलो तरी आम्हाला पुरोगामी विचार माहीत आहे, असं रोहित … Read more

Published On: 

🕒 1 min read

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्यावर वयावरून नेहमी टीका केली जाते. रोहित पवार पाळण्यात आहे, त्यांना काही कळत नाही, असं अनेकदा त्यांना ऐकावं लागतं.

याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. आम्ही पाळण्यात असलो तरी आम्हाला पुरोगामी विचार माहीत आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

We know progressive thinking and ethics – Rohit Pawar

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “खरंतर माझं वय कमी आहे. तर काही लोकांना पवार साहेबांचं वय जास्त वाटतं. तसं बघायला गेलं तर आम्ही सर्वजण अजून पाळण्यात आहोत. मग युवकांचा फायदा फक्त निवडणुकांमध्ये करून घ्यायचा.

आम्ही एखादं राजकीय वक्तव्य केलं किंवा एखादी राजकीय भूमिका मांडली तर पलीकडून सहज उत्तर येतं की आम्ही पाळण्यात आहोत. मात्र. आम्ही पाळण्यात असलो तरी आम्हाला शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार माहित आहे.

आम्हाला पुरोगामी विचार आणि नैतिकता माहित आहे. कोणत्या विचारांना पक्क राहायचं, हे आम्हाला माहित आहे. लहान बाळांना आणि लहान मुलांना या गोष्टी माहिती असतील, तर नेत्यांना या गोष्टी का कळत नाही? ज्यांनी मंत्री पद घेतली आहे, त्यांना या गोष्टी कळत नाही.”

पुढे बोलताना ते (Rohit Pawar) म्हणाले, “आम्ही मांडलेली भूमिका लोकांना खरी वाटते. कारण आम्ही मोकळ्या मनाने बोलतो. आम्ही सत्तेसाठी बोलत नाही.

आम्ही जी भूमिका घेतो, ती लोकांची भूमिका असते. अजित पवार मोठे नेते आहेत. मी नेता बनण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. मी विचार जपण्यासाठी राजकारणात आलो आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही