Vijay Wadettiwar | नागपूरमध्ये पूर परिस्थिती, विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर संतापले; म्हणाले…

Vijay Wadettiwar | नागपूर: राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. तर नागपूर शहरात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. शहरामध्ये जागोजागी पाणी साचल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर लष्कर आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी सूत्र हातात घेतले असून बचाव कार्य सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Nag river has not been cleaned – Vijay Wadettiwar

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “पंधरा-वीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच मी नागपूरची ही स्थिती पाहिली आहे. कॉर्पोरेशनच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाही. त्यामुळे सर्व भार आयुक्तांवर आहे. शहरातील बरीच कामे झालेली नाही.

शहरातील नाल्यांची सफाई झालेली नाही. त्याचबरोबर नाग नदीची स्वच्छता झालेली नाही. या ठिकाणी 105 ते 110 मिलिमीटर पाऊस पडला आहे.

एवढा पाऊस पडेपर्यंत प्रशासन का झोपलं होतं का? त्यांना याबाबत माहीत नव्हतं का? सरकारच्या नाकर्तेपणामुळे नागपूरवर ही स्थिती वाढवली आहे.”

दरम्यान, नागपूरमध्ये निर्माण झालेले आहे या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील भाष्य केलं आहे.

ट्विट करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली.

नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.