Ambadas Danve | “जज साहब तारीख तो मिल रही पर इंसाफ…”; अंबादास दानवे यांची सत्तासंघर्षावर खोचक प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ambadas Danve | औरंगाबाद : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन वेगळे गट तयार झाले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाकडून नेहमीच शिंदे गटाला गद्दार म्हणत टीका केलेली आपण पाहतो. ‘खरी शिवसेना कोणाची?’ यावर देखील अनेक वाद झाले आहेत. इतकंच नाही तर, हा वाद सर्वोच्च न्यायालयात देखील गेला.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पेच प्रकरणात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होती. आज कदाचित १६ आमदारांना अपात्र ठरवलं जाईल अशी चर्चा होती. मात्र तसं काहीही घडलं नाही. सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी १४ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र सत्तासंघर्ष पेच प्रकरणी सलग सुनावणी होईल असं सांगितलं आहे. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत असून, अनिल कपूरचा (Anil Kapoor) डायलॉग मारत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सत्तासंघर्षावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

दानवे म्हणाले की, अनिल कपूरचा ‘मेरी जंग’ सिनेमा होता. त्याच्यामध्ये त्याने जो  डायलॉग मारला आहे, तारीख पे तारीख,तारीख पे तारीख…जज साहब तारीख तो मिल रही पर इंसाफ नही मिल रहा!, तशीच काही स्थिती या तारखांच्या निमित्ताने निर्माण झाली असल्याचं मला वाटत आहे.”

हरकत नाही 14 तारीख जरी आली असली. त्या दिवशी का होत नाही, सर्व काही परिस्थिती समोर आहे. पक्षबंदीचा कायदा काय आहे, पक्ष आदेश काय आहे. या सर्व गोष्टी स्पष्ट असतांना, आतातरी 14 तारखेला न्यायालयाने निर्णय द्यावा असे अपेक्षित असल्याचं अंबादास  दानवे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :