Sanjay Shirsat | एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री राहतील – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे.

अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर ते राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा दरम्यान भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मोठं विधान केलं आहे.

2024 ला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील, राज्यात भाजपच्या नेतृत्वाचं पुन्हा एकदा सरकार येणार असं प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं.

प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री राहतील, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

There is nothing wrong with him taking the name of Devendra Fadnavis – Sanjay Shirsat

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “प्रसाद लाड हे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहे. त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेणं काही गैर नाही.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील, असं आम्हाला वाटतं. तर अजित पवार गटाला वाटतं की अजित दादा मुख्यमंत्री होतील. राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायला हवा.

म्हणून प्रसाद लाड यांनी जरी म्हटलं असलं तरी आमचं देखील तेच म्हणणं आहे. ज्या पद्धतीने आज एकनाथ शिंदे साहेब काम करत आहे, त्यानुसार आगामी काळात त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं, अशी आमची इच्छा आहे.”

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावरून बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं होतं. “एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भारतीय जनता पक्षाला परिणाम भोगावे लागू शकतात.

शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास 05 ते 10 टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपचे प्लॅन कामी येणार नाही”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.