Dhangar Reservation | धनगर समाजाचं आंदोलन पेटणार? उपोषणकर्त्यांनी सोडले उपचार

Dhangar Reservation | अहमदनगर: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मराठा समाजानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज देखील पेटून उठला आहे.

धनगर समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संजय बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर गेल्या 18 दिवसांपासून उपोषण करत आहे. यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.

धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी 21 सप्टेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीतील चर्चा निष्फळ ठरली आहे.

त्यामुळे अण्णासाहेब रुपनवर आणि संजय बंडगर यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. तसेच त्यांनी आपला ऑक्सिजन मास्कही काढला आहे. यानंतर धनगर समाजाचं हे आंदोलन आणखीन पेटण्याची भीती निर्माण झाली आहे.

यादरम्यान बाळासाहेब दोडकले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.”सरकारने आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासन दिले आहे. आमचा अनुसूचित जमातीत समावेश करावा एवढीच आमची मागणी आहे.

धनगर समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागं घेणार नाही”, असं बाळासाहेब दोडतले यांनी म्हटलं आहे.”

Gopichand Padalkar met the agitators of Dhangar community on Friday

दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी (22 सप्टेंबर) धनगर समाजाच्या (Dhangar Reservation) आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. धनगर आरक्षणाबाबत सरकार दोन महिन्यात सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही पडळकर यांनी आंदोलकांना दिली आहे.

मात्र, तरी देखील आंदोलकांनी आपलं आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. धनगर समाजातील तरुणांनी देखील आरक्षणासाठी आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन आंदोलकांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.