Ashish Shelar | विजय वडेट्टीवार आहे तरी कोण? – आशिष शेलार

Ashish Shelar | मुंबई: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत येत्या दोन आठवड्यात सुनावणी घेऊन माहिती देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 25 सप्टेंबर रोजी ही सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी एक मागणी केली आहे.

शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या मागणीनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी वडेट्टीवारांवर टीका केली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलत असताना आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “विजय वडेट्टीवार आहे तरी कोण? ते सुप्रीम कोर्टातले वकील आहे का? की प्रॅक्टिस करणारे वकील आहे?

विजय वडेट्टीवार विधानसभा विरोधी पक्ष नेते आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेत्यानं तेवढंच विधान केलं, तर ते बरं राहील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर चालणाऱ्या सुनवाईमध्ये बिब्बा टाकण्याचं काम वडेट्टीवार का करत आहे? याकडे जरा शिवसेना ठाकरे गटाने लक्ष घ्यावं.

The case of disqualified MLA should be heard through live broadcast – Vijay Wadettiwar

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी अपात्र आमदार प्रकरणाची सुनवाई लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे करण्याची मागणी केली आहे. ट्विट करत विजय वडेट्टीवार म्हणाले, “शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी.

राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष सुनावणीकडे आहे.

संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केलेली आहे. आशा करतो की ते ही मागणी मान्य करतील.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.