Share

MLA Disqualification | शिंदेंचे आमदार अपात्र ठरणार? शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज होणार सुनावणी

MLA Disqualification | टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला उशीर होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना झापलं होतं. त्यानंतर या सुनावणीच्या घडामोडींनी धरला आहे.

शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या याचिकेवर आज (25 सप्टेंबर) दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस बजावली आहे.

A regular hearing will be held today regarding the disqualification of MLAs

आमदारांच्या अपात्रतेबद्दल होणारी आजची सुनावणी नियमित सुनावणी असली तरी यातून राज्यातील सत्तासंघर्षाची पुढील दिशा ठरणार आहे.

आजच्या या सुनावणीमध्ये सत्तासंघर्ष प्रकरणी वेळापत्रक जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

दरम्यान, शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणी सुनावणी ऑनलाइन लाइव प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे.

ते म्हणाले, “शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी.

राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष सुनावणीकडे आहे.

संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केलेली आहे. आशा करतो की ते ही मागणी मान्य करतील.”

महत्वाच्या बातम्या

MLA Disqualification | टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला उशीर होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now