Share

पंजाबराव डख यांचा हाय अलर्ट! पुढच्या २४ तासांत ‘या’ १७ जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नवा अंदाज वर्तवला असून, पुढील २४ तासांत राज्यातील तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा मोठा इशारा दिला आहे.

Published On: 

Panjabrao Dakh monsoon forecast heavy rain alert in 17 districts of Maharashtra

🕒 1 min read

मान्सून राज्यात दाखल होऊन तब्बल २० दिवस उलटले तरी पावसाचा पत्ता नव्हता, यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण आता अखेर ती बहुप्रतीक्षित आनंदाची बातमी आली आहे!

गेल्या २४ तासांपासून मुंबईसह राज्याच्या विविध भागांत पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. हवामान खात्याने (Panjabrao Dakh Forecast) २२ जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होईल असा जो अंदाज वर्तवला होता, तो आता तंतोतंत खरा ठरतोय. येत्या ३० जूनपर्यंत पावसाचा हा जोर कायम राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Panjabrao Dakh Monsoon Forecast

दुसरीकडे, राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनीही मान्सूनबाबत एक मोठा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, येत्या १० जुलैपर्यंत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढलेला पाहायला मिळेल.

पुढील काही तासांत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, बीड, परभणी, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ अशा तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

डख यांच्या अंदाजानुसार, २४ ते २६ जून या काळात राज्यात पावसाचा तडाखा सर्वाधिक असणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे. डख यांनी स्पष्ट केलंय की, कोणत्याही शेतकऱ्याने काळजी करण्याचं कारण नाही, कारण सर्वांच्या पेरण्या आता अगदी वेळेत पूर्ण होणार आहेत.

आज मुंबई, पुणे, घाटमाथा, नाशिक आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालेल. त्यानंतर हाच पाऊस मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे सरकेल. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आता सर्वत्र पाऊस बरसणार असल्याने ग्रामीण भागात पेरण्यांना मोठा वेग येणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही