Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: सत्ताधारी आणि विरोधकांनी आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
2024 पर्यंत पत्रकारांनी आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये. म्हणून तुम्ही त्यांना चहा प्यायला आणि ढाब्यावर घेऊन जा. चहा प्यायला घेऊन जायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला समजलं असेल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी बावनकुळे यांना चांगलं धारेवर धरलं आहे. त्यानंतर आता या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Journalists are the fourth pillar of our judiciary – Chandrashekhar Bawankule
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “आपण एवढं चांगलं काम करतो, म्हणून मी असंच म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात खूप चांगलं काम केलं आहे.
तरी देखील खूप निगेटिव्ह बातम्या येत असतात. पत्रकारांना चहा प्यायला बोलवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे चहा प्यायला जा आणि त्यांना खरी वस्तुस्थिती सांगा.
कारण शेवटी समाजात पत्रकारांना मोठं स्थान आहे. पत्रकार आपल्या न्यायव्यवस्थेतील चौथा स्तंभ आहे. पत्रकारांना सन्मान देऊन त्यांच्यासोबत चांगलं वागा, या अर्थानं मी ते विधान केलं आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाईट हेतू नव्हता.
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे जी, तुम्ही राज्यातील पत्रकारांना काय चिरीमिरी घेणारे समजताय का ? देशातील १२ पत्रकार विकले गेले म्हणून सगळे पत्रकार स्वतःचा इमान विकतील असं नाही.
दुसऱ्यांचे पक्ष फोडून, इडी सीबीआय सारख्या संस्थांचा धाक दाखवून ही भाजप विरुद्ध आवाज दबत नाही आहे. त्यामुळे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तुमच्या पक्षातील सर्व नेत्यांची आणि अंधभक्तांची वाढलेली अस्वस्थता आम्ही समजू शकतो.
पण त्यामुळे तुम्ही थेट पत्रकारांना चिरीमिरी द्यायला निघाले? तुमची आजची अवस्था पाहून आगामी निवडणुकीत तुम्ही मतांसाठी जनतेला सुद्धा चिरीमीरी द्यायचा प्रयत्न करणार हे नक्की…. पण जनता २०२४ मध्ये भाजपची चिंधी उधळल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | बावनकुळे राज्यातील पत्रकारांना चिरीमिरी घेणारे समजताय का? – विजय वडेट्टीवार
- Supriya Sule | भाजपला पत्रकारांना निर्भीडपणे काम करू द्यायचं नाही – सुप्रिया सुळे
- Ajit Pawar | अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात का गेलो नाही? अजित पवार म्हणतात…
- Uddhav Thackeray | सहकार क्षेत्रात भाजपचं काहीच योगदान नाही – ठाकरे गट
- MLA Disqualification | शिंदेंचे आमदार अपात्र ठरणार? शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज होणार सुनावणी