Supriya Sule | भाजपचे नेतृत्व पक्ष आणि घर फोडण्यात मग्न; सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: अतिवृष्टीमुळे नागपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूरच्या या परिस्थितीवरून विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना धारेवर धरलं आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. भाजपचे नेतृत्व पक्ष आणि घर फोडण्यात मग्न असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

We should all come together and help to improve the situation of Nagpur – Supriya Sule

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस माझे राजकीय विरोधक असले तरी जेव्हा ते तुम्हाला भेटायला येतात, तेव्हा त्यांची गाडी अडवणं अत्यंत चुकीचं आहे. या कृतीचं मी समर्थन करणार नाही.

नागपूरची परिस्थिती सुधारण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मदत केली पाहिजे. परंतु, भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व घर आणि पक्ष फोडण्यात मग्न आहे. भारतीय जनता पक्षातील नेतृत्वांना बदल करण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी वेळ नसतो, हे त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा.

चहा प्यायला घेऊन जा म्हणजे काय तुम्हाला समजलंच असेल, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. बावनकुळे यांच्या या वक्तव्यावरून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे.

त्या म्हणाल्या, “विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही‌. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात.

राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे.

ज्याअर्थी चंद्रशेखर बावनकुळेजी कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे.

भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.