Nitesh Rane | राऊत आणि दानवेंच्या चिंतेत वाढ! विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून नितेश राणेंनी केली कारवाईची मागणी

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला उशीर केला आहे. यावरून सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर (Rahul Narwekar) यांना झापलं आहे.

तर या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अनेक विधान केली आहेत.

याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहिलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या विरोधात विशेषाअधिकार भंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

Appropriate action should be taken against Sanjay Raut and Ambadas Danve – Nitesh Rane

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ते म्हणाले, “श्री. संजय राऊत, राज्यसभा सदस्य, यांनी नजीकच्या काळात मा. विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात पुढील वक्तव्ये केली.

१. “संविधान, कायदा व विधीमंडळाशी येईमानी करुन वेळकाढूपणा पाससाय. घटनात्मक पदावर बसलेले विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्य सरकारसा चालवित आहेत काय?”

२. “आम्ही करू ते खरं अशी बादशाही विधानसभा अध्यक्ष करीत असतीस तर ती बादशाही बुडाल्याशिवाया राहणार नाही.”

३. “ विधानसभा अध्यक्ष फुटले आहेत. ”

श्री. अंबादास दानवे वि.प.स., विरोधीपक्ष नेता, विधान परिषद यांनी मा. विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भात पुढील प्रमाणे वक्तव्य केले. “उशीरा न्याय देणे हा सुध्दा अन्याय असतो आणि तो अन्याय विधानसभा अध्यक्ष करीत आहेत. ”

मा. अध्यक्ष, विधानसभा यांच्या समोर सद्या पक्षांतरबंदी विषयी एका प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. या प्रकरणामध्ये उपरोक्त दोन्ही व्यक्तिंचे राजकीय हितसंबंध आहेत.

या पार्श्वभुमीवर नमुद वक्तव्ये करुन त्यांनी मा. विधानसभा अध्यक्षांवर अनुचित दबाव व प्रभाव टाकण्याची ही केली असून त्याद्वारे मा. विधानसभा अध्यक्षांच्या व पर्यायाने विधानसभेचा अधिक्षेप केला आहे.

यांचे अशा प्रस्फोटक भाष्य केल्यामुळे अध्यक्षांवर एक प्रकारे दबाव टाकण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे, यामुळे लोकशाहीच्या हितासाठी या प्रवृत्तीला मुळासकट आळा घालण्यासाठी त्यांच्या बोलण्यावर तात्काळ बंदी आणणे अत्यंत गरजेचे आहे व त्या अनुसार कारवाई करावी अशी मागणी करतो.

वर नमुद वस्तुस्थिती पहाता सर्वश्री संजय राऊत व अंबादास दानवे यांच्या विरुध्द योग्य ती कारवाई करण्यासाठी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे तात्काळ सुपूर्द करावे व ह्यावर विनाविलंब निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात यावे. ही विनंती.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.