Asim Sarode | राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करताय – असीम सरोदे

Asim Sarode | टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला उशीर होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना झापलं होतं. त्यानंतर या सुनावणीच्या घडामोडींनी वेग धरला आहे.

आज दुपारी 03 वाजता शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

Rahul Narwekar does not want to respect the constitution – Asim Sarode

असीम सरोदे (Asim Sarode) म्हणाले, “विधानसभेच्या कामकाजामध्ये हस्तक्षेपत करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही. त्यामुळे संवैधानिक तरतुदीनुसार न्यायालय विधानसभा अध्यक्षांना वेळेबद्दल काहीही सांगू शकत नाही.

मात्र, विधानसभा अध्यक्ष या गोष्टीचा गैरफायदा घेताना दिसत आहे. सुप्रीम कोर्ट आपल्याला कोणत्याही प्रकारचे आदेश देऊ शकत नाही, हे राहुल नार्वेकर यांना चांगल्या प्रकारे माहित आहे.

त्यामुळे नार्वेकरांना संविधान मानायचं नाही. विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत आहे. बंडखोरी केलेल्या आमदारांना लोकांनी मनातून अपात्र ठरवलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुका या आमदारांसाठी अत्यंत कठीण असतील.”

दरम्यान, या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी घेतलेला निर्णय नियमबाह्य किंवा घटनाबाह्य नसेल. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची घाई केली जाणार नाही.

परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखला जाईल. घटनात्मक तरतुदी लक्षात ठेवून आणि नियमांचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. यामध्ये कोणावरही कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. त्याचबरोबर प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.