#Breaking | काद्यांवरून विधानसभेत गदारोळ; सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

#Breaking | मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Budget Session) आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रात कांद्याचा मुद्द्यावरुन राजकारण चांगलेच पेटले आहे. आज विधानभवनात देखील याचे पडसाद उमटले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून कांद्याच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले जात आहेत.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, आज कांद्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी बघायला मिळाली. यावेळी आक्रमक झालेल्या विरोधकांनी नाफेडमार्फत कांदा खरेदी करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली. यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं बघायला मिळालं आहे. कांद्याची निर्यात वाढवण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे.

‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभं आहे. ‘कांदा खरेदी सुरु झाली असून जेथे कांदा खरेदी सुरु झालेली नाही तेथे ती सुरू केली जाईल’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत दिली आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन

आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पायऱ्यांवर उतरत जोरदार आंदोलन केले. कांद्याला (Onion Rate) हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांसह आता आमदार कांदा प्रश्नी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विधानभवनाच्या कामकाजाची सुरूवात कांद्याच्या प्रश्नावरून झाली.

छगन भुजबळ काय म्हणाले?

कांद्याचा प्रश्न गंभीर आहे. मुख्यमंत्री हे शेतकरी आहेत. ते शेती करतात. तुर्की आणि पाकिस्तान या ठिकाणी मोठया प्रमाणात कांद्याला मागणी आहे.  इतर देशांतील व्यापारी आपल्या कांद्याला नकार देतात कारण आपल्या निर्यातीमध्ये सातत्य पाहायला मिळत नाही. आपण लवकर दिल्लीश्वरांशी बोलून  यावर तोडगा काढावा. तर अजित पवार म्हणाले,  राज्यातील कांदा आणि कापुस उत्पादक शेतकरी बेजार आहे. काल एका शेतक-याने विष घेण्याचा प्रयत्न केला. यावर मार्ग काढला पाहिजे.  केंद्र सरकारने याचा विचार केला पाहिजे”, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

कांद्याच्या प्रश्नावरून  विरोधक आक्रमक झाले. मुख्यमंत्री बोलत असताना देखील गोंधळ घालण्यास सुरूवात केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपल्याला मार्ग काढायचा आहे की राजकारण करायचं आहे हे ठरवा असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृह शांत केले.

“शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो”

सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुरुवातीलाच विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. कांदा आणि कापूस उत्पादकांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाचया पाय-यावरती आंदोलन केलं. गळ्यात कांद्याच्या आणि कापसाच्या माळा घालत राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झालेले दिसले.

महत्वाच्या बातम्या