Nitesh Rane | एखाद्या पत्रकाराची चहाची तहान भगत असेल तर त्यात काय वाईट; बावनकुळेंच्या वक्तव्यावर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पत्रकारांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या ऑडिओ क्लिपवरून विरोधकांनी बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. अशात आता या मुद्द्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या पत्रकाराची चहाची तहान भागत असेल तर त्यात वाईट काय आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Why is everything viewed in the wrong frame? – Nitesh Rane

चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठिंबा देत नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानानंतर एखाद्या पत्रकाराचे पोट भरत असेल किंवा एखाद्या पत्रकाराची चहाची तहान भागत असेल तर त्यात वाईट काय आहे.

ढाब्यावर अत्यंत चांगल्या प्रकारचं जेवण मिळतं. परंतु, जर पत्रकारांना ते जेवण नको असेल तर त्यांच्या मनात काही वेगळं सुरू आहे का? सर्व गोष्टी चुकीच्या चौकटीत का बघितल्या जातात?

दरम्यान, या वक्तव्यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका केली आहे. ते म्हणाले, “बावनकुळे साहेब, ज्याप्रमाणे दिल्लीतले पत्रकार तुम्हाला सोयीस्कर भूमिका घेतात त्याप्रमाणे महाराष्ट्रातले पत्रकारही तुमच्या दबावाला, प्रलोभनांना बळी पडून तुम्हाला सोयीस्कर भूमिका घेतील हा तुमचा समज असेल तर मग तुम्हाला अजून महाराष्ट्र कळलेला दिसत नाही.

महाराष्ट्राचा स्वाभिमान कधीच दिल्लीसमोर झुकत नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही मांडलेली भूमिका मला पूर्णतः चुकीची वाटते, याबाबत मराठी पत्रकारही त्यांची भूमिका मांडलतीलच!”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.