Nitesh Rane | वर्धा: भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. सध्या ते वर्धा दौऱ्यावर आहेत. नितेश राणे यांनी काँगेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर सडकून टीका केली आहे. राहुल गांधी विकासाबद्दल का बोलत नाही? असा सवाल नितेश राणे यांनी यावेळी उपस्थित केला.
वर्धा दौऱ्यावर असताना भाजप नेते नितेश राणे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. “अमोल कोल्हे कुठे भेटू दे त्याला दाखवतोच.” अशा शब्दात नितेश राणेंनी त्यांच्यावर टीका केली. नितेश राणेंच्या या विधानामुळे पुन्हा एक नवीन राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “कुठला तो अमोल कोल्हे नावाचा ॲक्टर. शिवाजी महाराजांचे रोल पैसे घेऊन करतो. तो काही फुकट काम करत नाही. तो फक्त नावासाठी खासदार झाला आहे. त्याने जर दाढी काढली तर त्याला कोणी ओळखणार पण नाही. तो फक्त सिरीयल पुरताच मर्यादित आहे.”
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत नितेश राणे म्हणाले, “राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमधील पत्रकार परिषदा बघा. त्यामध्ये ते फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत आहे. त्याचबरोबर ते हिंदू धर्म आणि साधुसंतांवर टीका करताना दिसत आहे. हे सोडून ते बाकी काहीच करत नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Gandhi Godse Ek Yudh | ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटात चिन्मय मांडलेकर यांची दमदार भूमिका, पाहा ट्रेलर
- Weather Update | राज्यातील तापमानात घट, शेतकरी सापडला चिंतेत
- Hasan Mushrif | “कुठलाही गुन्हा नाही, समंस नाही आणि…”; हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
- Nitesh Rane | “आदित्यच्या बापाचेच पद…”; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
- Navneet Rana | “आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच” – नवनीत राणा