Share

Prithviraj Chavan | विलासराव देशमुखांचे चिरंजीव अमित भाजपात प्रवेश करणार?; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “ते भाजपात येणार…”

🕒 1 min read Prithviraj Chavan | औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे पुत्र, माजी मंत्री काँग्रेसचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि आमदार धीरज देशमुख हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज औरंगाबाद दौऱ्यावर असताना अमित देशमुखांच्या चर्चांवर मोठं विधान केलं. येत्या … Read more

Published On: 

🕒 1 min read

Prithviraj Chavan | औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे पुत्र, माजी मंत्री काँग्रेसचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि आमदार धीरज देशमुख हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज औरंगाबाद दौऱ्यावर असताना अमित देशमुखांच्या चर्चांवर मोठं विधान केलं. येत्या काही काळात भाजपात अनेक दिग्गज नेते प्रवेश करणार आहेत. लवकरच हे बॉम्बस्फोट होतील, असं भाकीत बावनकुळे यांनी केलं.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हे देखील आज औरंगाबादेत होते. अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या मुद्द्यावर भाष्य करणं त्यांनी टाळलं. अमित देशमुख भाजपात येणार की नाही, हे भाजपच्या अध्यक्षांना माहिती असेल असं म्हणत त्यांनी एका वाक्यात याबद्दल उत्तर दिलं.

दरम्यान, यावर माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “भाजपात अनेकजण प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यात लातूरच्या प्रिन्सची सुद्धा इच्छा झाली आहे. पण, लातूरमध्ये ऑक्सिजन नव्हतं तेव्हा प्रिन्स शहराबाहेर होते. आता सत्तेवर राहण्यासाठी आणि आपण केलेली चुकीची काम लपवण्यासाठी भाजपात यायचं म्हणत आहेत. मात्र, हे काय येत नाहीत आणि आम्ही काय घेत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्हाला प्रिन्स नको, तर सर्वसामान्य कार्यकर्ता भाजपात हवा.”

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

Chhatrapati Sambhajinagar Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या