Share

Prakash Ambedkar | आदित्य ठाकरेंनी ठाण्यातून निवडणूक लढवली तरी मी प्रचाराला जाईल – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar | मुंबई: आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे.

मी युतीधर्म पाळणार. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी विधानसभा निवडणूक ठाण्यातून लढवली तर मी त्यांच्या प्रचाराला जाणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Politically I am very clear – Prakash Ambedkar

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, “वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची युती झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांपर्यंत आमची युती राहिली तर आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक ठाण्यातून लढली तर मी त्या ठिकाणी त्यांच्यासोबत प्रचाराला जाईल.

मी युतीधर्म पाळणार आहे. समोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जरी असले तरी मी आदित्य ठाकरे यांच्या प्रचाराला जाणार. राजकीय दृष्ट्या मी अत्यंत क्लिअर आहे. शरद पवार आणि काँग्रेसचा अदानींसंदर्भात नरोबा, कुंजोबा सुरू आहे, तसं माझं नाही.”

पुढे बोलताना ते (Prakash Ambedkar) म्हणाले, “01 सप्टेंबर 2023 रोजी काँग्रेस पक्षाला आम्ही युती संदर्भात पत्र पाठवलं होतं. मात्र, त्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन यांचं उत्तर आलेलं नाही. काँग्रेसचं आमंत्रण यायचं तेव्हा येईल. तोपर्यंत आम्ही बेसावध राहणार नाही.

लोकसभेच्या 48 जागांसाठी उमेदवार फायनल करण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही आता महाराष्ट्र दौरा करणार आहोत.

यासाठी आमच्या लातूर, सातारा, बीड आणि नाशिक येथे जाहीर सभा होणार आहे. निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे आम्ही आता कामाला लागलो आहोत.”

महत्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar | मुंबई: आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी मोर्चा बांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now