Ambadas Danve | ये डर अच्छा है; CM शिंदेंचा परदेशी दौरा पुढे ढकलण्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: 01 ऑक्टोबर 2023 पासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) परदेशी दौऱ्यावर जाणार होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांचा हा दौरा अचानक पुढे ढकलण्यात आला आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेत असल्यामुळे शिंदेंनी त्यांचा हा दौरा पुढे ढकलला असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परदेशी दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा दौरा पुढे ढकलला असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

Aditya Thackeray raised questions on Eknath Shinde’s foreign visit – Ambadas Danve

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परदेशी दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले होते. या दौऱ्याचा खर्च कोण करत आहे? हा दौरा का होत आहे?

हा दौरा कसा होत आहे? असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी जर प्रश्न उपस्थित केले नसते तर त्यांचा हा परदेशी दौरा झालाच असता. ये डर अच्छा है, असा एका हिंदी चित्रपटातील डायलॉग आहे. सध्या तीच स्थिती निर्माण झालेली दिसत आहे.”

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या परदेशी दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी आठवड्याभराच्या परदेशी दौऱ्याचे नियोजन केलं आहे. त्यांचा हा दौरा सहलीसारखा असू नये.

त्यांनी दावोसदौरा सहलीसारखा केला होता. या दौऱ्यादरम्यान 28 तासासाठी सरकारने 40 कोटी रुपये खर्च केले होते. त्यांच्या या दौऱ्यामुळे आपल्या देशात परदेशी गुंतवणूक होणार असेल तर या दौऱ्यावर माझा आक्षेप नाही. मात्र, त्यांनी सहलीप्रमाणे हा दौरा करू नये.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.