Share

Sanjay Raut | 2024 पर्यंत भाजप फुटलेला असेल – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणामध्ये दोन मोठे भूकंप येऊन गेले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या बंडखोरीचा समावेश आहे. या दोघांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अशात आता या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणामध्ये दोन मोठे भूकंप येऊन गेले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या बंडखोरीचा समावेश आहे.

या दोघांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अशात आता या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

2024 पर्यंत भारतीय जनता पक्ष फुटलेला असेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि ठाकरे गटामध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Who is in this NDA? – Sanjay Raut 

आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “भारतीय जनता पक्ष यांच्या नेतृत्वामध्ये स्थापन झालेली एनडीए आघाडी फक्त एक प्रकारची नौटंकी आहे.

विरोधकांची इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर त्यांना त्यांच्या एनडीएची हळूहळू आठवण व्हायला लागली आहे. तोपर्यंत त्यांना एनडीएची आठवण झाली नव्हती.

इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर त्यांनी इकडून तिकडून लोक गोळा करायला सुरुवात केली आहे. त्यानंतर त्यांनी एनडीएची एक बैठक घेतली. कोण आहे या एनडीएमध्ये? एनडीएमध्ये शिवसेना आणि अकाली दल नसेल तर ती आघाडी शून्य आहे.

एनडीएची ताकद अकाली दल आणि शिवसेना होती. बाकी लोक येतात आणि जातात. एनडीए अस्तित्वात नाही. एनडीएमध्ये सध्या जे चित्र दिसत आहे, ते भविष्यात असेल की नाही याबाबत मला शंका आहे. 2024 च्या आधी भारतीय जनता पक्ष सुद्धा फुटलेला असेल.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक राहिली असेल, तर ते 16 आमदारांच्या अपात्रतेचा लवकर निर्णय घेतील.

माझे लोक माझ्याविरुद्ध गेले आहे, हे उद्धव ठाकरेंना ज्या दिवशी कळलं होतं, त्या दिवशी त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही