🕒 1 min read
BJP Meeting | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या एनडीए आघाडीला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने देखील कंबर कसली आहे. जेपी नड्डा (JP Nadda) मुंबईमध्ये भाजपची बैठक घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
The meeting will be held in Dadar on October 3
आगामी निवडणुकांमधील रणनीती ठरवण्यासाठी जेपी नड्डा लवकरच मुंबईत भारतीय जनता पक्षाची बैठक घेणार आहे. 03 ऑक्टोबर रोजी दादरमध्ये ही बैठक पार पडणार आहे. दादर येथील वसंत स्मृती या ठिकाणी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकांसाठी अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी त्यांच्या देवगिरी बंगल्यावर आज समर्थक आमदारांची बैठक बोलावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट दोघांनीही राष्ट्रवादीच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.
राष्ट्रवादीची ही सुनावणी 06 ऑक्टोबर 2023 पासून होणार आहे. अजित पवार गटानं विधानसभेतील 53 पैकी 43 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे.
तर विधान परिषदेतील 09 पैकी 06 आमदार आपल्यासोबत असल्याचं अजित पवार गटानं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी ही समर्थक आमदारांची बैठक बोलावली असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.
महत्वाची बातम्या
- Ambadas Danve | ये डर अच्छा है; CM शिंदेंचा परदेशी दौरा पुढे ढकलण्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया
- Raj Thackeray | ‘मराठी पाट्या’ या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दाखवला हिरवा झेंडा; राज ठाकरे म्हणतात…
- Sanjay Raut | 2024 पर्यंत भाजप फुटलेला असेल – संजय राऊत
- Eknath Shinde | सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांमुळे अजितदादा शरद पवारांपासून दूर गेले; शिंदेंच्या नेत्याचा दावा
- Ajit Pawar | राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह कोणाचं? अजित पवारांनी बोलवली समर्थक आमदारांची बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











