Supriya Sule | चहा पाजण्याची गोष्ट पहिल्यांदाच ऐकली; सुप्रिया सुळेंनी बावनकुळेंचे कान टोचले

Supriya Sule | बारामती: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

2024 पर्यंत पत्रकारांनी आपल्या विरोधात बातमी छापू नये, यासाठी तुम्ही त्यांना चहा प्यायला घेऊन जा. चहा प्यायला घेऊन जायचं म्हणजे नक्की काय करायचं? तुम्हाला समजलं असेल.

त्याचबरोबर त्यांना तुम्ही ढाब्यावर घेऊन जा, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

A journalist and a politician have a different relationship – Supriya Sule

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “आतापर्यंत पाणी पाजणाऱ्यांच्या गोष्टी ऐकल्या होत्या. मात्र, पत्रकारांना चहा पाजण्याची गोष्ट पहिल्यांदाच ऐकली आहे.

पत्रकार आणि राजकारण्याचं आगळ वेगळं नातं असतं. त्यामध्ये कधी गोडवा असतो, तर कधी कटूता येते. पत्रकारिता आणि राजकारण एकमेकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.”

दरम्यान, या मुद्द्यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “पत्रकारांनी विरोधात बातमी दिली तर त्यांना धाब्यावर न्या असं म्हणून पत्रकारांच्या स्वाभिमानावर हल्ला करणारे चंद्रशेखर बावनकुळे यांना हे माहित नसेल की, पत्रकार आप-आपली भूमिका ही योग्यप्रकारे मांडत असतात.

तुमच्या बाजूने किंवा तुमच्या विरोधात बातम्या देणं हा त्यांचा हक्क आणि अधिकार आहे. जेवणासाठी ते लाचार आहेत असं म्हणून आपण त्यांचा अपमान केलेला आहे.

तुम्ही धाब्यावर न्या, हॉटेलवर न्या, नाहीतर घरी जेवायला न्या. पत्रकार हा पत्रकार म्हणूनच काम करतो आणि तो नि:पक्षणे पत्रकारिता करीत असतो.

तो त्याचा अधिकार आहे. आपण धाब्यावर नेले काय किंवा घरी जेवायला बोलावले काय. सध्याचं वातावरण बघता पत्रकार विरोधात लिहीत आहेत; ते का लिहीत आहेत, याचे आत्मपरिक्षण करा म्हणजे विषय संपेल.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.