Share

Girish Mahajan | स्वतःच सोडायचं आणि दुसऱ्याच्या मागे पळायचं हा उद्योग विरोधक का करतात? – गिरीश महाजन

Girish Mahajan | टीम महाराष्ट्र देशा: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या बीड येथील साखर कारखान्याला जीएसटी आयुक्तालयाने नोटीस बजावली आहे. या घटनेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पंकजा मुंडे भाजप नेत्या असून देखील त्यांच्या कारखान्याला ही नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरलं आहे.

भारतीय जनता पक्ष पंकजा मुंडेंवर अन्याय करत असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. विरोधकांच्या या टीकेला गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधकांनी व्यवस्थित राहून त्यांचा पक्ष सांभाळावा, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

We are capable of maintaining our party – Girish Mahajan

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, “विरोधकांना सध्या काही काम नाही, त्यामुळे ते अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात.

विरोधकांनी व्यवस्थित राहून त्यांचा पक्ष सांभाळायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लोक चालले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) लोक थांबायला तयार नाही.

स्वतःच सोडायचं आणि दुसऱ्याच्या मागे पळायचं हा उद्योग विरोधक का करतात? मला कळत नाही. त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळायला हवा. आमचा पक्ष सांभाळण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. त्याचबरोबर पंकजाताई आमच्यासोबत आहे.”

दरम्यान, या मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. त्या म्हणाल्या, “जुन्या हिंदी सिनेमातील ‘अपनों पे सितम, गैरों पे करम’ या गाण्याची आठवण यावी अशी स्थिती भाजपातील मूळ कार्यकर्त्यांची आहे.

भाजपाच्या निष्ठावंतांवर किती अन्याय होतो याचे उदाहरणच द्यायचे झाले तर पंकजाताई मुंडे यांना मिळणाऱ्या सापत्न वागणूकीचे दिले पाहिजे.

इतर पक्षांतून भाजपात आलेल्या नेत्यांच्या कारखान्याला मदतीचा हात देण्यात आला आहे. परंतु यातून पंकजाताई मुंडे यांच्या कारखान्याला डावलण्यात आले.

विशेष म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या प्राप्तिकर माफी योजनेतही पंकजाताईंच्या कारखान्याचा समावेश नाही. शिवाय नव्या कर्जासाठी थकहमीही देण्यात आली नाही.

नमूद करण्याची बाब म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंकजाताईंच्या कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेतली होती.

थोडक्यात भाजपाच्या निष्ठावंतांची भाजपातच वंचना सुरू असून बाहेरच्या नेत्यांची मात्र पाचही बोटे तुपात आहेत. आपल्याच कार्यकर्त्याची अवहेलना करण्याचा पॅटर्न भाजपात रुजलेला आहे.”

महत्वाच्या बातम्या

Girish Mahajan | टीम महाराष्ट्र देशा: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या बीड येथील साखर कारखान्याला जीएसटी आयुक्तालयाने नोटीस …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now