Share

Maratha Reservation | देवेंद्र फडणवीसांनी मतदानासाठी मराठा समाजाला गृहीत धरू नये – मनोज जरांगे

Maratha Reservation | बीड: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विनंतीचा मान राखत जरांगे यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं होतं. उपोषण मागं घेतलं असलं तरी आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया … Read more

Published On: 

Maratha Reservation | बीड: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विनंतीचा मान राखत जरांगे यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं होतं.

उपोषण मागं घेतलं असलं तरी आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे (काल 26 सप्टेंबर) नारायण गडावर गेले होते. त्यावेळी बोलत असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे.

Eknath Shinde can give reservation to Maratha community – Maratha Reservation

मनोज जरांगे म्हणाले, “फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देऊ शकतात, असा आम्हाला विश्वास वाटत आहे. मराठा समाजाने मुख्यमंत्री शिंदेंवर विश्वास टाकला आहे.

काही वर्षांपूर्वी एका उद्घाटन समारंभासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नारायण गडावर आले होते. त्यावेळी त्यांनी नारायणगडावरून मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, असं म्हटलं होतं.

मात्र, अजूनही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालेलं नाही. याच पार्श्वभूमीवर मतदानासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला गृहीत धरू नये.

पुढे बोलताना ते म्हणाले, “सर्व राजकीय पक्षातील नेत्यांना मोठं करण्यासाठी गेल्या 75 वर्षापासून मराठा समाजातील तरुण काम करत आहे. या तरुणांसाठी काहीतरी करण्याची वेळ सरकारवर आता आली आहे.

अशात सरकारने जर आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर ठोस तोडगा काढला नाही तर मराठी समाज कोणत्याही नेत्याला पाठिंबा दर्शवणार नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही