Keshav Upadhye | काँग्रेसचा पुळका आलेल्या पक्षाची उभी हयात त्यांच्या विरोधात गेलीये; केशव उपाध्येंचं ठाकरे गटावर टीकास्त्र

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षावर खोचक टीका केली आहे.

कांग्रेस हा गंजलेल्या लोखंडासारखा आहे असे तुम्ही म्हणत असाल, पण भाजप हा विचार नसलेल्या पोकळ बांबूसारखा झाला आहे. गंजलेल्या लोखंडावर काँग्रेसचा डोलारा तरला आहे, पण मोदी-शहांच्या वेस्ट इंडिया कंपनीचे काय?

ईस्ट इंडिया जे कायदे पाळत होती तेवढेही कायदे मोदी-शहांची कंपनी पाळायला तयार नाही, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

ठाकरे गटाच्या या टीकेला भाजप प्रवक्त केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदी-शहा आणि भाजपचे सरकार ‘बेस्ट इंडिया’ होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

चर्चेत राहण्यासाठी तुमच्या सारखी ‘वेस्ट’ बडबड करण्याची कोणाला आवड आणि गरज दोन्ही नाहीये, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

BJP government is trying to become ‘Best India’ – Keshav Upadhye

ट्विट करत केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले, “60 वर्ष देशावर सत्ता असताना, हवी तशी लूटमार, भ्रष्टाचार करून स्वतःची पोटं भरणाऱ्या काँग्रेसच्या ‘टेस्ट इंडिया कंपनीला’ 2014 साली जनतेनं बाजूला फेकून दिलं. आज 10 वर्षं भ्रष्टाचारमुक्त सरकार दिल्यामुळे

◾️11 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले गेले आहे.
◾️जगाचा आर्थिक विकास दर 2.7% असताना भारताचा सर्वाधिक 7.8% आहे.
◾️विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत आहे
◾️15000 किलोमीटर चे नवीन रस्ते झाले आहेत.
◾️10 कोटी गरीब लोकांना आयुष्मान भारत योजनेतून मोफत उपचार करता येत आहेत
◾️80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्यात येत आहे
◾️कोरोनाच्या महामारीत मोफत लसीकरण करून 27 देशांना लस पुरवली आहे
◾️करोडो लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरासाठी अडीच लाख रुपयांची मदत केली आहे.

आणि अशा विविध योजनांमधून कोट्यवधी शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार यांचे राहणीमान उंचावले आहे.
कांग्रेसचा नव्याने आलेला एवढा पुळका दाखवताना आपल्या पक्षाची उभी हयात त्यांच्या विरोधात गेली, हे विसरू नका.

मोदी-शहा आणि भाजपचे सरकार ‘बेस्ट इंडिया’ होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. चर्चेत राहण्यासाठी तुमच्या सारखी ‘वेस्ट’ बडबड करण्याची कोणाला आवड आणि गरज दोन्ही नाहीये.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe