Share

Chitra Wagh | गांजा ओढून बेताल बडबड करणाऱ्या राऊतांमुळे ठाकरेंचा उरला सुरला पक्ष बुडतोय – चित्रा वाघ

🕒 1 min read Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं भारतीय जनता पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे सरकार बेकायदा ठरवूनही ते सरकार चालू देणे हे गंजलेल्या मेंदूचे व गांजलेल्या विचारांचे लक्षण आहे. काँग्रेस गंजलेले लोखंड असेल तर भाजप हा ‘गांजलेला’ पक्ष आहे. गंज काढण्याच्या अनेक उपाययोजना … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं भारतीय जनता पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे सरकार बेकायदा ठरवूनही ते सरकार चालू देणे हे गंजलेल्या मेंदूचे व गांजलेल्या विचारांचे लक्षण आहे. काँग्रेस गंजलेले लोखंड असेल तर भाजप हा ‘गांजलेला’ पक्ष आहे.

गंज काढण्याच्या अनेक उपाययोजना आहेत. गांजलेल्यांचे वैफल्य व नैराश्य दूर करणे कठीण असते. काँग्रेसचा गंज उतरू लागला आहे व लोखंडही सोन्यासारखे उजळून निघेल, पण गांजलेल्यांचे काय?

काँग्रेस पक्ष हा गंज आलेल्या लोखंडासारखा असून त्याचा ताबा आता ‘शहरी नक्षलवाद्या’कडे आहे असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. पंतप्रधान सध्या सर्व लवाजमा घेऊन निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांत दौरे करीत आहेत, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे. ठाकरे गटाच्या या टीकेला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sanjay Raut bankrupted his own party – Chitra Wagh

ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “देशातील जनतेनं तब्बल दोन वेळा 300 पेक्षा जास्त खासदार निवडून देत, भाजपला पसंती देत सत्तेच्या खुर्चीत बसवलं. तुमचे खासदारही पंतप्रधान मोदींच्याच चेहऱ्यावर निवडून आलेत.

भाजप काय आहे हे लुटारूंचा म्होरक्या असलेल्या सर्वज्ञानी संजय राऊतांनी मराठी माणसाला सांगू नये. गंज लागण्यासाठी ज्यांच्याकडे बुद्धी ही शिल्लक नाही, त्याच निर्बुद्ध संजय राऊतांनी स्वतःचाच पक्ष दिवाळखोरीत काढला, हे जगजाहीर आहे.

उद्धव ठाकरेंची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी बनवून ठेवली. गांजा ओढून बेताल बडबड करणाऱ्या राऊतांमुळे उरला सुरला पक्ष बुडत आहे याची दखल तरी उद्धव ठाकरेंनी घ्यावी.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही