Share

Bacchu Kadu | अपंगांची कामं होत नसतील तर तुमच्या मुख्यमंत्रीपदाला काही अर्थ नाही – बच्चू कडू

Bacchu Kadu | चंद्रपूर: ‘दिव्यांगांच्या दारी अभियाना’निमित्त आमदार बच्चू कडू चंद्रपूरमध्ये दाखल झाले होते. यावेळी बोलत असताना त्यांनी विविध गोष्टींवर भाष्य केलं आहे. अधिकाऱ्यांचे पगार, मानधन इत्यादी गोष्टी 05 तारखेच्या आत बँक खात्यात जमा होतात. मात्र, दिव्यांगांचं मानधन चार-चार महिने जमा होत नाही. अपंगांची काम होत नसतील तर तुमच्या मुख्यमंत्री पदाला काही अर्थ नाही, असं … Read more

Published On: 

Bacchu Kadu | चंद्रपूर: ‘दिव्यांगांच्या दारी अभियाना’निमित्त आमदार बच्चू कडू चंद्रपूरमध्ये दाखल झाले होते. यावेळी बोलत असताना त्यांनी विविध गोष्टींवर भाष्य केलं आहे.

अधिकाऱ्यांचे पगार, मानधन इत्यादी गोष्टी 05 तारखेच्या आत बँक खात्यात जमा होतात. मात्र, दिव्यांगांचं मानधन चार-चार महिने जमा होत नाही.

अपंगांची काम होत नसतील तर तुमच्या मुख्यमंत्री पदाला काही अर्थ नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांच्या विधानानंतर त्यांच्यात आणि शिंदे गटात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

We will continue to fight with disabled people till our last breath – Bacchu Kadu 

बच्चू कडू म्हणाले, “अपंगांना अनेक प्रश्न आणि दुःखांना सामोरे जावे लागते, म्हणून दिव्यांगांसाठी शासनाने निर्णय म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून काम केलं पाहिजे.

दिव्यांगांसाठी आम्ही अनेक आंदोलन केली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मंत्रालय उभं राहिलं आहे. दिव्यांगाना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रामाणिकपणे काम करावं. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत दिव्यांगासोबत लढत राहणार आहोत.

पुढे बोलताना ते म्हणाले, “शासकीय योजना दिव्यांगापर्यंत कशा पोहोचता येतील, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. येत्या काही महिन्यांमध्ये दिव्यांगांसाठी चांगल्या योजना आणल्या जातील.

निर्धार तसेच दिव्यांगांना 1500 रुपये महिना दिला जातो. परंतु, कधीकधी ही रक्कम वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. प्रत्येक महिन्याच्या 05 तारखेपर्यंत निराधार आणि दिव्यांगांना ही रक्कम मिळावी, यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही