Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण मिळणार? मनोज जरांगे आजपासून करणार राज्यात दौरे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू केलं होतं.

15 हुन अधिक दिवस त्यांनी अन्नत्याग करत उपोषण केलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीवरून त्यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं.

उपोषण मागे घेतलं असलं तरी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नसल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे आज महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते तब्बल 13 जिल्ह्यांना भेट देणार आहे.

Manoj Jarange will leave for Maharashtra tour from today

मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी मनोज जरांगे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते तब्बल 13 जिल्ह्यांना भेट देणार आहे.

त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात अंतरवली सराटी या गावातून होणार आहे. तर त्यांचा पहिला मुक्काम परभणी जिल्ह्यातील जिंतूर या ठिकाणी होणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे जालना जिल्ह्यासोबतच संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार आहे. मराठवाड्यानंतर ते यवतमाळ, नाशिक, अहमदनगर, सोलापूर आणि बुलढाणा या जिल्ह्यांना देखील भेट देणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला 40 दिवसांचा वेळ दिला होता. 14 ऑक्टोबर रोजी या 40 दिवसातील 30 दिवस संपणार आहे.

14 ऑक्टोबरला मराठा समाजाची जाहीर सभा घेणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं होतं. या सभेच्या पार्श्वभूमीवर आणि मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी मनोज जरांगे हा दौरा करत असल्याचं बोललं जात आहे.

मनोज जरांगे यांच्या या दौऱ्यादरम्यान नक्की काय घडणार? त्यांच्या दौऱ्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? याकडे आता संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe