Devendra Fadnavis | मुंबई: देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आज अजित पवार (Ajit Pawar) दाखल झाले होते.
त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) उपस्थित होते. गोपीचंद पडळकर आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. अशात हे दोघे एकमेकांच्या समोर दिसून आले आहे.
As soon as Ajit Pawar came to the Sagar bungalow, Gopichand Padalkar went out
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर योगायोगाने गोपीचंद पडळकर आणि अजित पवार एकत्रित उपस्थित होते.
मीडिया रिपोर्टनुसार, अजित पवार सागर बंगल्यावर येताचं गोपीचंद पडळकर बाहेर निघून गेले. अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या घरी आल्याचे कळतच गोपीचंद पडळकर बंगल्याच्या बाहेर पडले. अजित पवारच्या गेटने आत आले त्याच गेटने गोपीचंद पडळकर बाहेर गेल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर आणि अजित पवार यांच्यामध्ये वाद सुरू आहे. गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल बोलत असताना अत्यंत खालच्या स्तराची भाषा वापरली होती.
त्यानंतर भाजप आणि अजित पवार गटामध्ये वाद निर्माण झाला होता. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेमुळे अजित पवारांनी त्यांच्यासोबत बोलण्याचं टाळलं असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.
“अजित पवार यांच्याविषयी आमच्या मनात स्वच्छ भावना नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. आम्ही अजित पवारांना मानत नाही.
त्यामुळे आम्ही त्यांना पत्र दिलं नाही आणि यापुढेही देखील देणार नाही”, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि अजित पवार गटात वाद झाला होता.
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane | ठाकरे गट म्हणजे शरद पवारांनी थुंकलेली सुपारी – नितेश राणे
- Chitra Wagh | गांजा ओढून बेताल बडबड करणाऱ्या राऊतांमुळे ठाकरेंचा उरला सुरला पक्ष बुडतोय – चित्रा वाघ
- Vijay Wadettiwar | ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगेंच्या मागणीला आमचा विरोध – विजय वडेट्टीवार
- Bacchu Kadu | अपंगांची कामं होत नसतील तर तुमच्या मुख्यमंत्रीपदाला काही अर्थ नाही – बच्चू कडू
- Keshav Upadhye | काँग्रेसचा पुळका आलेल्या पक्षाची उभी हयात त्यांच्या विरोधात गेलीये; केशव उपाध्येंचं ठाकरे गटावर टीकास्त्र