Share

Devendra Fadnavis | ओबीसी-मराठा वाद निर्माण होणार नाही, याची शासन काळजी घेणार – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | चंद्रपूर: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पेटून उठला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे. त्यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी समोर आली आहे. या मागणीला ओबीसी समाजानं विरोध दर्शवला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी चंद्रपुरात ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू आहे. आज … Read more

Published On: 

Devendra Fadnavis | चंद्रपूर: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पेटून उठला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे.

त्यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी समोर आली आहे. या मागणीला ओबीसी समाजानं विरोध दर्शवला आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी चंद्रपुरात ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू आहे. आज देवेंद्र फडणवीस या आंदोलन स्थळी दाखल झाले आहे. त्यानंतर आंदोलकांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं आहे.

चंद्रपूरमध्ये बोलत असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका पार पाडणार आहे. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नये, याची आम्ही काळजी घेणार आहोत.

दोन्ही समाज एकमेकांच्या विरोधात राहतील, अशी परिस्थिती आम्ही निर्माण होऊ देणार नाही. त्याचबरोबर बहुतांश मराठा समाजाची हीच अपेक्षा आहे. कारण राज्यामध्ये आपण सर्व एकत्रितपणे राहतो.

त्यामुळे दोन समाजामध्ये वाद होतील, असे निर्णय राज्य सरकार घेणार नाही. कालच्या बैठकीमध्ये ओबीसी समाजाने काही मागण्या मांडल्या आहेत, त्यातील बहुतांश मागण्यांवर सरकारने सकारात्मक विचार केला आहे.”

The entire meeting with the OBC community has been recorded – Devendra Fadnavis 

पुढे बोलताना ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “ओबीसी समाजासोबत झालेली संपूर्ण बैठक रेकॉर्ड झाली आहे. ही रेकॉर्डिंग राष्ट्रीय ओबीसी महासंघाला देण्यात येणार आहे.

त्यामुळे सरकार आश्वासन देईल. मात्र, ते पूर्ण करणार नाही, असं होणार नाही. आश्वासन देऊन पूर्ण न करणारे आम्ही नाही. ओबीसी समाजासाठी आम्ही 26 जीआर काढले आहे.

ओबीसी समाजातील तरुणांच्या शिक्षणासाठी देखील राज्य सरकारने चांगले निर्णय घेतले आहे. या पुढेही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगले निर्णय घेणार आहोत.

मी मुख्यमंत्री असताना ओबीसी समाजाचं वेगळं मंत्रालय केलं. या मंत्रालयाच्या माध्यमातून ओबीसीसाठी स्वतंत्रपणे कारभार सुरू झाला.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही