Aditya Thackeray | नार्वेकरांच्या वेळकाढूपणामुळे महाराष्ट्रातील लोकशाहीची हत्या होतेय – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) खूप वेळ घेत असल्याचं ठाकरे गटानं म्हटलं आहे.

अशात राहुल नार्वेकर घाणा देशाच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा अचानक रद्द झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नार्वेकरांवर खोचक टीका केली आहे.

Like the illegal Chief Minister, the Assembly Speaker canceled his foreign tour – Aditya Thackeray

ट्विट करत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “मी योग्य प्रश्न विचारताच, बेकायदा मुख्यमंत्र्यांप्रमाणे विधानसभा अध्यक्षांनी आपला परदेश दौरा रद्द केला.

नार्वेकर जी ह्यांच्या वेळकाढूपणामुळे महाराष्ट्रातील लोकशाहीची हत्या होत असताना ते राष्ट्रकुल संसदीय परिषदेला निघाले होते. हाच मोठा विनोद होता.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात विलंब का होतोय, याचे उत्तर नार्वेकर जी ह्यांनी महाराष्ट्राला आधी द्यावे.

त्यांची निष्क्रियता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या लोकशाहीवर आणि मतदानाच्या शक्तीवर विश्वास असलेल्या प्रत्येकावर अन्याय करणारी आहे.”

दरम्यान, आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना धारेवर धरलं आहे. आपले स्पीकरसाहेब घानाच्या भूमीवर निघाले आहेत ते जगाची लोकशाही बळकट करण्यासाठी.

त्यांच्या राज्यात लोकशाही धाराशाही पडली आहे व स्पीकरसाहेबांच्या शेरवानीवर त्या रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत. लोकशाहीचा मुडदा पाडणाऱयांचे स्वागत घानात होणार आहे काय?

लोकशाहीचा पवित्र आत्मा लोकशाहीच्या मंदिरात मारायचा व त्याच लोकशाहीची ‘घंटा’ बडवत घाना देशी लोकशाहीच्या आंतरराष्ट्रीय मंचावर मिरवायचे हे ढोंग आहे.

लोकशाहीचा खून करून लोकशाही कल्याणाची प्रवचने झोडणे म्हणजे इदी अमिनने मानवतेवर चर्चा करण्यासारखेच आहे. स्पीकरसाहेब (ट्रिब्युनल) घानात निघाले होते.

मात्र अखेर जनमताचा रेटा एवढा वाढला की, स्पीकर महाशयांनी हा दौरा रद्द केला, अशी बातमी हा मजकूर छापता छापता आली. निदान यापुढे तरी जनमताला गृहीत धरू नका, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.