Share

Dhangar Reservation | धनगर समाज आक्रमक! आरक्षणासाठी नगर-संभाजीनगर महामार्ग रोखला

Dhangar Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. मराठा समाजाचं आंदोलन सुरू असताना धनगर समाजाने देखील आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे. आरक्षण मिळावं, यासाठी धनगर समाजाने आज (30 सप्टेंबर) नेवासा येथे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. तर दुसरीकडे आदिवासी बांधवांनी नगर-कल्याण महामार्गावर आंदोलन छेडलं आहे. Road stop movement … Read more

Published On: 

Dhangar Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. मराठा समाजाचं आंदोलन सुरू असताना धनगर समाजाने देखील आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे.

आरक्षण मिळावं, यासाठी धनगर समाजाने आज (30 सप्टेंबर) नेवासा येथे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. तर दुसरीकडे आदिवासी बांधवांनी नगर-कल्याण महामार्गावर आंदोलन छेडलं आहे.

Road stop movement is going on, on Ahmednagar Sambhajinagar highway

सकल धनगर समाजाच्या (Dhangar Reservation) वतीने अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये नेवासा तालुक्यातील धनगर समाज सामील झाला आहे.

यावेळी आंदोलकांनी आरक्षणाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली आहे. तर दुसरीकडे आदिवासी बांधवांनी देखील आंदोलन सुरू केलं आहे.

धनगर समाजाला आरक्षण देत असताना त्यांना अनुसूचित जातीमध्ये सामील करू नये, असं आदिवासी समाजाने म्हटलं आहे. धनगर समाजासाठी ज्या काही योजना आणायच्या त्या आणा. त्यांना सुविधा देताना आदिवासींच्या विभागातला पैसा खर्च होता कामा नये, अशी मागणी धनगर समाजातून करण्यात आली आहे.

दरम्यान, धनगर समाज (Dhangar Reservation) आणि आदिवासी समाजाचं आंदोलन सुरू असताना मराठा आंदोलनाचा मुद्दा देखील चर्चेत आहे. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहे.

या दौऱ्यादरम्यान ते तब्बल 13 जिल्ह्यांना भेट देणार आहे. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात अंतरवली सराटी या गावातून होणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे मराठवाड्यासह यवतमाळ, नाशिक, सोलापूर, बुलढाणा आणि अहमदनगर या जिल्ह्यांना भेट देणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही