Sanjay Raut | एकनाथ शिंदेंच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली का? – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: 24 ऑक्टोबर 2023 रोजी दसरा मेळावा पार पडणार आहे. गेल्या वर्षी शिंदे गट आणि ठाकरे गट दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आमने-सामने आले होते. तर यावर्षी देखील दोन्ही गटांमध्ये या मेळाव्यावरून वाद सुरू झाला आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनीही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावं, यासाठी मुंबई महानगरपालिकेला अर्ज केला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे.

The splinter group is not the real Shivsena – Sanjay Raut

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली होती का?

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आहे. तर उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झालेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची खरी शिवसेना आहे. हा फुटलेला गट खरी शिवसेना नाही.

त्यांच्या हातात राज्यातील सत्ता आहे, म्हणून ते काहीही करतील. गेल्या वर्षी शिवसेना मेळावा शिवाजी पार्कला झाला होता. यावर्षी देखील तिथेच होणार.”

दरम्यान, ठाकरे गटाने सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर खोचक टीका केली आहे. लोकशाहीचा मुडदा पाडणाऱयांचे स्वागत घानात होणार आहे काय?

लोकशाहीचा पवित्र आत्मा लोकशाहीच्या मंदिरात मारायचा व त्याच लोकशाहीची ‘घंटा’ बडवत घाना देशी लोकशाहीच्या आंतरराष्ट्रीय मंचावर मिरवायचे हे ढोंग आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे. ठाकरे गटाच्या या टीकेला केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, ”

“शकुनी मामा, विधानसभेच्या अध्यक्षांनी काय करावे? हे ते ठरवतील. त्यांना बहुमताने निवडून दिले आहे. रोज काड्या मोडायला काहीतरी मुद्दा लागतो. आज हा मिळाला काय?

शिंदे गटाकडे गेलेल्या आमदारांच्या मतांवर आपण राज्यसभेवर गेला आहात आणि रोज सकाळी बडबडण्याशिवाय दुसरा धंदा नाही.

आदित्य ठाकरे परदेशी कशासाठी गेले होते, तो खर्च कुणी केला आणि त्यातून मिळाले काय याचा प्रथम हिशोब द्या, मग तोंडाची वाफ घालवा.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.