Share

Keshav Upadhye | आदित्य ठाकरेंच्या परदेशी दौऱ्याचा हिशोब द्या अन् मग तोंडाची वाफ घालवा – केशव उपाध्ये

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर खोचक टीका केली आहे.

राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) घाणा देशाच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा अचानक रद्द झाला आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्षांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

ठाकरे गटाच्या या टीकेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे गटाकडे गेलेल्या आमदारांच्या मतांवर आपण राज्यसभेवर गेला आहात आणि रोज सकाळी बडबडण्याशिवाय दुसरा धंदा नाही, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

Why did Aditya Thackeray go abroad? – Keshav Upadhye

ट्विट करत केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले, “शकुनी मामा, विधानसभेच्या अध्यक्षांनी काय करावे? हे ते ठरवतील. त्यांना बहुमताने निवडून दिले आहे. रोज काड्या मोडायला काहीतरी मुद्दा लागतो. आज हा मिळाला काय?

शिंदे गटाकडे गेलेल्या आमदारांच्या मतांवर आपण राज्यसभेवर गेला आहात आणि रोज सकाळी बडबडण्याशिवाय दुसरा धंदा नाही.

आदित्य ठाकरे परदेशी कशासाठी गेले होते, तो खर्च कुणी केला आणि त्यातून मिळाले काय याचा प्रथम हिशोब द्या, मग तोंडाची वाफ घालवा.”

दरम्यान, ठाकरे गटानं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. राज्यातील लोकशाही, संविधान, सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा खुंटीला टांगून आपले स्पीकरसाहेब (ट्रिब्युनल) हे घाना नामक देशी लोकशाही, संसद या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चेत भाग घ्यायला निघाले आहेत.

ही एक विसंगती आहे व विनोद तर आहेच आहे. एक वर्षापासून येथे घटनाबाह्य सरकार अधिकारावर आहे. शिवसेनेतून फुटलेल्या 40 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निवाडा दिला तरीही ‘स्पीकर’ वर्षभर सुनावणी घेत नाहीत व सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दटावले तेव्हा ते लोकशाहीवर चर्चा करण्यासाठी घानाला निघाले आहेत.

घाना देशात 66 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत ते उपस्थित राहणार आहेत. तेथे म्हणे जागतिक संसदीय लोकशाही, राजकीय प्रश्नावर विचारमंथन होणार असून आपले स्पीकरसाहेब तेथे लोकशाहीवर चर्चा करतील. इकडे आपल्या नजरेसमोर लोकशाही, संविधानाचा मुडदा पाडायचा आणि परदेशात जाऊन लोकशाहीवर प्रवचने झोडायची, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर खोचक टीका केली …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now